fbpx

जुनी पेंशन योजना सुरु करण्याच्या मागणीसाठी पेंशन दिंडी

करमाळा/ अनिता नितीन व्हटकर :1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाकारुन कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात घालविले आहे. ही जुनी पेन्शन योजना सुरू करावी म्हणून तीन दिवस संप केला. तरी शासनाने कोणत्याच प्रकारे दखल घेतली नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने 2 आँक्टोबर पासून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी पासून मुंबई पर्यंत पेन्शन दिंडी काढण्यात येण्याबाबतचे निवेदन तहसिलदार साहेब करमाळा यांना आज देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य समन्वयक  सोमनाथ अनारसे, जिल्हा सहकार्याध्यक्ष साईनाथ देवकर, करमाळा तालूकाध्यक्ष अरुण चौगुले, उदय काटूळे विनोद वारे, किरण सानप, पोपट पाटील, बाळू आदलिंग, विशाल शहाणे, हनुमंत सरडे ,बाळासाहेब गोरे, उमेश पाटील, महेश कांबळे, विकास माळी आदी उपस्थित होते.

1 नोव्हेंबर 2005 पासून नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शासनाने केलेल्या अन्यायामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी 2 आँक्टोंबर पासून शिवनेरी ते मुंबई पायी दिंडी काढण्यात येणार असून या दिंडीत सोलापूर जिल्ह्यातून हाजारो शिक्षक जाणार असल्याची माहीती करमाळा तालूकाध्यक्ष श्री अरुण चौगुले यांनी दिली.

काश्मीर खोऱ्यात माथेफिरू, फुटीरतावाद्यांचा हिंसाचार, तीन पोलीस शहीद