पेगॅसस : फोन टॅपिंग करून कर्नाटक सरकार पाडले गेले ?

bjp vs congress

बंगळूर – सध्या पेगॅसस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.

दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधकांना सरकारवर टीका करण्याची चांगली संधी मिळाली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आप, शिवसेना यासह सर्वच विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. यातच आता कर्नाटकमधील जेडीएस आणि कॉँग्रेस आघाडीचे सरकार फोन टॅपिंग करून पाडण्यात आले, असा आरोप आता होऊ लागला आहे.  जुलै 2019 मध्ये कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले आणि भाजपने सत्ता स्थापन केली. या संपूर्ण घटनाक्रमाचा कथित हेरगिरीशी संबंध असल्याचा दावा करण्यात येत आहे.

कर्नाटकात 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे दुसऱया क्रमांकावर असलेल्या काँग्रेसने जेडीएससोबत सत्ता स्थापन केली. दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिले होते. कॉँग्रेसच्या या खेळीमुळे दुखावलेल्या भाजपने पेगासस स्पायवेअर तंत्राचा वापर करून हेरगिरी करत कर्नाटकातील सरकार पाडल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP