मुंबई : केंद्र सरकार पेगाससचा वापर करून राजकीय नेते, पत्रकार यांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याच्या आरोप काँग्रेसने केला आहे. याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज राजभवनासमोर आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार पेगॅससचा वापर करून राजकीय नेते, पत्रकार यांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजभवनासमोर आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/JcRwo24nwP
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 22, 2021
फोन टॅपिंगप्रकरणावरून देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘जलयुक्त शिवार योजनेवर कॅगचा ठपका, यात राजकारण नाही’, बाळासाहेब थोरातांचे स्पष्टीकरण
- मोठी बातमी! माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल
- ‘कोरोना योद्ध्यांच्या ५० लाखांच्या विम्याचा निर्णय ५ ऑगस्टपर्यंत घ्या’, मुख्य सचिवांना निर्देश
- ‘मुंबईत ८० टक्के टक्केवारी आणि २० टक्के नालेसफाई’, अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला
- एसबीआयमध्ये ३ लाखांपर्यंत पीककर्ज देण्यात यावे, खा.ओमराजेंची अर्थराज्यमंत्री कराडांकडे मागणी