‘पेडणेकर ताई, दुसऱ्याची थोबाड फोडताना आपल्या पक्षाकडे कानाडोळा करणे शोभत नाही’

chitra wagh vs kishori pednekar

मुंबई : बोरिवली येथील एका भाजपा महिला नगरसेविकेच्या कार्यालयातच एका कार्यकर्त्याने एका महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी भाजपवरव भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ टीकास्त्र डागले होते.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, इतर घडलेल्या घटनांवर भाजपच्या महिला राजकारण करतात. स्वत:च्या दिव्याखाली अंधार. जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे? दरवेळेला राज्याला बदनाम केलं जातं. मी काही तरी वेगळं करते असे ताईगिरी दाखवता, पब्लिसीटी स्टंट करण्यासाठी पुढे येता आता गुपचिळी का? ताईगिरी करत होत्या त्यांचा फोन आता बंद असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

दरम्यान यावर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेवून पेडणेकर यांना खडेबोल सुनावले आहेत. ‘पेडणेकर ताई महापौर आहेत मोठ्या नेत्या आहेत. पण मी गृहणी असल्यामुळे मला यावर प्रतिक्रिया देण्यासाठी थोडा वेळ लागला. पेडणेकर ताई म्हणाल्या कि मी असते तर थोबाड फोडलं असत अगदी बरोबर आहे ताई थोबाड फोडायलाच हव, तुम्ही मुंबईच्या महापौर आहात, शिवसेनेच्या नेत्या देखील आहात. पण ताई तुमच्याच पक्षाच्या नगरसेविका महिलेची साडी फिटावी म्हणून त्यावर पाय देवून उभे असणारे तुमच्याच पक्षाचे नेते विनोद घोसाळकर याचं थोबाड तुम्ही तेव्हाच का नाहीत फोडले.

तुमच्याच पक्षाच्या माजी महापौरांनी भर रस्त्यात एका महिलेचा हात पिरगळा तेव्हा तुम्हाला त्याचं थोबाड फोडाव वाटल नाही का ? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी पेडणेकर यांना विचारला आहे. तसेच दुसऱ्याची थोबाड फोडताना आपल्या पक्षाकडे सविस्तर कानाडोळा करणे हे आपल्याला शोभत नाही. असा देखील घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या