शेकाप नेते सोमवंशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निलंग्यातील काँग्रेसची ताकद वाढली

adv. narayan somvanshi

लातूर: जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेतकरी पक्षाचे नेते कै. माधुकरराव सोमवंशी यांचे पुत्र तसेच माजी पंचायत समिती सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॅडव्होकेट नारायण सोमवंशी यांनी लातूर येथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवंशी यांच्या कॉंग्रेस पक्ष प्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षाचे अनेक मतं कॉंग्रेसला येण्याची शक्यत नाकारता येणार नाही.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे मात्र आता राज्यात दुबळी पडलेली कॉंग्रेस पुन्हा आता चांगलीच पुढे येत असल्याचे चित्र गेल्या काही आठवड्यांपासून बघायला मिळत आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चांगलाच झंझावात आवतार घेतलेला दिसतोय. त्यामुळे आता अनेक जण कॉंग्रेसमध्ये जात असल्याचे दिसत आहे. लातूर जिल्ह्यात आधी पासून कॉंग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे.

पक्ष प्रवेश करताना सोमवंशी म्हणाले, कॉंग्रेस हा पक्ष पुरोगामी विचारांचा आहे तसेच या पक्षाला मोठा इतिहास आहे, भारतीय स्वातंत्र्याचा, बलिदानाचा तसेच हा पक्ष जाती-धर्म सोबत घेऊन चालणार पक्ष असून शहरापासून ते ग्रामीण भागातील गावा गावात कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. या सर्व बाबींचा विचार करून आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे नारायण सोमवंशी यांनी सांगितले. भविष्यात पक्ष ज्या जबाबदऱ्या सोपवतील त्या यशस्वी पार पाडू, असेही ते म्हणाले

महत्वाच्या बातम्या 

IMP