बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला पर्ल पुरीचा जामीन अर्ज मंजूर

पर्ल पुरी

मुंबई :छोट्या पड्यावरील एकता कपूरच्या ‘नागिन ३ ’ ही मालिका अनेकांची लोकप्रिय आहे. मात्र या मालिकेतील एक माहिती समोर आली आहे. या मालिकेतील अभिनेता पर्ल व्ही पुरी याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.

पर्ल विरोधात एका महिलेने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ४ जून रोजी या माहिलेच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर पर्लने जामिनासाठी दिलेली याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली होती. मात्र आज वसई सत्र न्यायालयात या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पर्लने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. या मुलीचे वय 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान आहे. पर्लवर पॉक्सो कायद्या अंतर्गत कारवाई झाल्यामुळे जामीन मिळण्यास अडचणी येत होत्या.

पर्लच्या अटकेनंतर अनेक सेलिब्रिटी पर्लला पाठिंबा देत आहे. त्यामध्ये अनिता हसनंदानी, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना, एकता कपूर, अली गोनी, निया शर्मा यांचा समावेश आहे. या सर्वांनी पर्लच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केले आहे. या प्रकरणातील सत्यता लवकरच बाहेर येईल आणि पर्ल निर्दोष सुटेल असा दावा या सर्वांनी केला आहे.

पर्लला अटक झाल्यानंतर एकता कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने पर्ल हा निर्दोष असल्याचे म्हटले आहे. एकताच्या मते पीडित मुलीच्या पालकांमधील भांडणामध्ये निष्कारण पर्लचा बळी दिला जात आहे. मात्र, पर्लच्या विरोधात पुरावे सापडले असून त्यावरून तो दोषी असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर आता त्याला जमीन मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP