मोर पाळण्याच्या हौसेमुळे लालूप्रसाद अडचणीत

lalu-prasad-

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी घरात तब्बल १० मोर पाळले असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे .घरात मोर पाळणं कायद्याने गुन्हा असतानाही लालूंनी हे मोर पाळले असून त्यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पटना येथे सर्कुलर रोडवर लालूप्रसाद यादव यांचं सरकारी निवासस्थान आहे. यापूर्वी देखील लालूंच्या निवासस्थानी मोराची जोडी आढळून आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता . मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ अंतर्गत शेड्यूल-१ नुसार मोर पाळणं गुन्हा ठरवण्यात आला आहे. या कायद्यानुसार कुणाकडेही मोर आढळल्यास कारवाई करता येते. या कायद्यानुसार सात वर्षाची शिक्षा किंवा २५ हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.