जम्मू – काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसचा पीडीपीला पाठींबा?

नवी दिल्ली : भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा 19 जूनला पाठिंबा काढून घेतला होता, त्यानंतर जम्मू – काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. मात्र आता भाजप सोबत काडीमोड घेतल्यानंतर पीडीपी आणि काँग्रेस एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत कॉंग्रेसकडून मिळत आहेत.

त्यासाठी काँग्रेसच्या नियोजन समिती एक बैठकही होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या काँग्रेसच्या बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अंबिका सोनी, कर्ण सिंह आणि पी. चिदंबरमही सहभागी होणार आहेत.तसेच मंगळवारी काँग्रेस आमदारांची श्रीनगरमध्ये एक बैठक होणार आहे. या बैठकीत पीडीपीबरोबर सरकार स्थापनेसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी 44 आमदारांची आवश्यकता आहे. पीडीपीजवळ सद्यस्थितीत 28 आमदार आहेत. तर काँग्रेसकडे 12 आमदारांचं संख्याबळ आहे. पीडीपी आणि काँग्रेस एकत्र आले तरी त्यांना 4 आमदारांची गरज लागणार आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार 3 अपक्ष आमदार आणि 1 सीपीआयएम-जेकेडीऍफचे आमदारही त्यांच्यासोबत आहेत. तेसुद्धा सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहेत. अपक्ष आमदार सरकार स्थापनेसाठी मदत करतील.

कॉंग्रेसने आमदारांना कैद करून ठेवलं नसतं तर आम्ही सत्तेत आलो असतो – शहा