शहरातील टेरेसवर चालणारी हॉटेल्स बंद करण्याची मनसेची मागणी

पुणे – पिंपरी-चिंचवड शहरात इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेली हॉटेल्स बंद करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यात चिखले यांनी म्हटले आहे की, मुंबईतील लोअर परळ भागात कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या रुफटेरेस हॉटेलला 29 डिसेंबर रोजी आग लागून 14 जणांचा नाहक बळी गेला आहे.पिंपरी-चिंचवड शहरात देखील अनेक रुफ टेरेस हॉटेल्स असून त्यातील काही बेकायदेशीर आहेत.

याठिकाणी कमला मिल प्रमाणे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील टेरेसवर चालणारी सर्व हॉटेल बंद करण्यात यावीत, अशी मागणी चिखले यांनी निवेदनातून केली आहे