मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला त्याचा भाऊ साफीरमुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. बाबर आपल्या भावाला नेट प्रॅक्टिससाठी लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये घेऊन गेला होता. येथे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी त्याला गोलंदाजी करताना दिसला. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हापासून बाबरवर टीका केली जात आहे. हे प्रकरण वाढत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डही पुढे आले आणि पीसीबीने कर्णधार बाबरला नियमांची आठवण करून दिली.
बाबर आझमचा भाऊ सफीर याने लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरमधील नेट प्रॅक्टिसचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सरावाच्या वेळी बाबर स्वतःही उपस्थित होता आणि भावाला चुका सांगताना दिसला. बाबरच्या नातेवाईकाने लाहोरमधील हाय परफॉर्मन्स सेंटरच्या सुविधा वापरणे हे पीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे.
— safeer azam (@safeerazam10) May 14, 2022
वास्तविक, या केंद्रातील केवळ पाकिस्तानचे खेळाडू, प्रथम श्रेणी आणि ज्युनियर क्रिकेट खेळणारे खेळाडू अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर सुविधा वापरू शकतात. पण, बाबरचा धाकटा भाऊ साफीर अद्याप या पातळीवर क्रिकेट खेळत नाहीये. त्यामुळे यावरून गदारोळ झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com