न्यूटनच्या ऑस्कर एन्ट्रीवर प्रियांका नाराज

मराठमोळ्या अमित मासुरकरने न्यूटन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठविण्यात येणार आहे. न्युटनची निवड झाल्यापासून न्युटनवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अक्षयकुमार,अमिताभ बच्चन,यांनी देखील न्यूटनचे कौतक केले आहे. पण , पीसी म्हणजे प्रियांका चोप्रा मात्र न्यूटनवर नाराज आहे.

प्रियांका चोप्राच्या प्रोडक्शन हाऊसने मागील वर्षी व्हेंटीलेटर हा मराठी चित्रपट प्रोडूस केला होता.या चित्रपटाने चांगला गल्ला देखील जमवला होता. पीसीचा हा चित्रपट भारता तर्फे ऑस्कर निवडीसाठी पाठविला होता. यावेळी न्यूटन व व्हेंटीलेटर यांच्यामध्ये तगडी फाईट झाली.न्यूटन ने यामध्ये बाजी मारली. प्रियांका व तिची आई मधु यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे पीसी खूप नाराज झाली आहे.Loading…
Loading...