PAYTM: पेटीएम’ची रिटेल क्षेत्रात एन्ट्री

‘पेटीएम’ कंपनीने आता रिटेल क्षेत्रात पाऊल ठेवले असून पेटीएमने ऑनलाईन आणि अँड्रॉईड अॅपवर आधारित ‘पेटीएम मॉल’ लॉन्च केले आहे. सध्या अँड्रॉईड यूझर्ससाठी पेटीए मॉलचे अॅप विकसित करण्यात आले आहे. लवकरच आयओएसवर चालणाऱ्या अॅपल हँडसेटसाठी खास अॅप विकसित केले जाणार आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, या अॅपद्वारे 1.4 लाख विक्रेत्यांकडून ग्राहक फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तू खरेदी करु शकतील. पेटीएम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएम मॉल भारतीय ग्राहकांसाठी मॉल आणि मार्केट या दोन संकल्पनांचे एकत्रिकरण म्हणून सादर केले जाईल. नियमांचं योग्य पालन करणाऱ्या उत्पादन कंपन्या आपले प्रॉडक्ट्स पेटीएम मॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात येतील.