Paymate इंडिया लिमिटेड | मुंबई : पुरवठादार साखळीतील B2B व्यवहारांना डिजिटल, स्वयंचलित आणि सुप्रवाहीत करणाऱ्या Paymate इंडिया लिमिटेड या आघाडीच्या B2B पेमेंट आणि सेवा पुरवठादार कंपनीने आता आपल्या क्षमतेत आणखी सुधारणा केली. कंपनीच्या नव्या सुविधेद्वारे आता कमर्शियल क्रेडिट कार्डचा वापर करून सुविधा देयकांचा भरणा करणे शक्य होणार आहे.
Paymate चे ग्राहक आणि वापरकर्ते या सुविधेच्या माध्यमातून लँडलाइन बिल, वीजबिल, पाणीबिल, ब्रॉडबॅण्ड बिल अशी विविध प्रकारची नियमित आणि विक्रेत्यांशी व्यवहार करू शकतील.
याबद्दल paymate व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अजय अदिसेशन म्हणाले, ‘ Covid-19 महामारीच्या काळात सर्वच व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना व्यवहारांच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करणे कठीण बनले होते. Paymate च्या माध्यमातून सुविधा बिले भरण्यासाठीची व्यवस्था करून आम्ही आमच्या ग्राहकांना कमर्शियल क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी अधिक व्यापक मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे आमच्या ग्राहकांना आता B2B व्यवहारांचे आणखी एक दालन खुले झाले आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत Paymate च्या प्लॅटफार्मवरून कमर्शियल क्रेडिट कार्डच्या माध्यमातून २२,४६७.९२ दशलक्ष रुपये इतके प्रत्यक्ष कराचे व्यवहार आणि ९९,९२९.६७ दशलक्ष रुपये इतके जीएसटी व्यवहार पूर्ण केले. एकूण कमर्शियल क्रेडिट कार्ड प्रक्रियेतील टीपीव्ही मूल्य आर्थिक वर्ष २०२१च्या तुलनेत ४६४७६६.४५ दशलक्ष रुपयांवरून १८७१४२.३१ दशलक्ष रुपयांपर्यंत वाढून पोहोचले आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पेमेट प्लॅटफॉर्मवरील ग्राहक आणि वापरकत्त्र्यांची संख्या १६६८११ इतकी बनली आहे.
Paymate ही कंपनी यूएईमध्ये व्हिसा प्रमाणिक बिझनेस पेमेंट सॉल्युशय्न प्रोव्हायडर (बीपीएसपी) म्हणूनही कार्यरत असून भविष्यात ती मध्य युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका खंडातही विस्तार करण्याचे ध्येय बाळगून आहे. Paymate व्हिसाशी दृढ संबंध असल्या कारणाने व्हिसा संबंधित वित्तीय संस्थांना Paymate सुविधा स्वीकारण्यासाठी व्हिसा प्रोत्साहन देते. paymate देखील काही ठरावीक आंतरराष्ट्रीय प्रांतांमध्ये Paymate द्वारे व्यवहार होणारे क्रेडिट कार्ड व्हिसा कार्ड असतील, याची खबरदारी घेणार आहे.
या प्रसिद्धीपत्रकात अमेरिकेतील सिक्युरिटीजकरिता कोणतीही ऑफर वा आमिष दिलेले नाही. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अॅक्ट ऑफ 1933 (सुधारित सिक्युरिटीज अॅक्ट) किंवा अमेरिकेतील कोणत्याही राज्यातील सिक्युरिटीज कायद्याानुसार या सिक्युरिटीजची नोंदणी केलेली अथवा करण्यात येणार नाही. अशा सिक्युरिटीज अमेरिकेत कोणत्याही नोंदणीखेरीज दिल्या अथवा विकल्या अथवा हस्तांतरित केल्या जाणार नाहीत.
Paymate इंडिया लिमिटेड बद्दल
पुरवठा साखळीमधील B2B व्यवहार डिजिटल, स्वयंचलित आणि सुरळीत करणारी Paymate ही आघाडीची पेमेंट आणि सेवा पुरवठादार कंपनी आहे. डिजिटल इनव्हॉइसिंग आणि अन्य पूरक सुविधांच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट व्यवस्थेद्वारे पारंपरिक कागदी कामकाजापासून सॉफ्टवेअर आधारीत कामकाजाची अद्यायावत सुविधा Paymate प्लॅटफॉर्मद्वारे पुरवली जाते. ही कंपनी सध्या दक्षिण आशिया (भारत) आणि यूएई या देशांत कार्यरत असून भविष्यात सीईएमईए देशांत विस्तार करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. Paymate ला बीटी-केपीएमजी बेस्ट बँकमार्फत ‘बेस्ट फिनटेक इन पेमेंट्स’ आणि 2021चा फिनटेक ज्युरी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
- Anil Desai : धनुष्यबाण मिळविण्याच्या लढाईत आता अनिल देसाईंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
- Uddhav Thackeray : “भाजपाला एक तर शिवसेना संपवायचीय आणि ती संपवताना त्यांना ठाकरे…” ; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- Abdul Sattar : “… तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला तयार”, अब्दुल सत्तारांच ठाकरेंना आव्हान
- Uddhav Thackeray : बंडखोरांनी आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन मत मागवीत, पण हे माझे वडीलही चोरायला निघालेत – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray : “हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत”; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<