‘आपणास आणखी एक हत्यारा, हुकूमशहा वा फॅसिस्ट हवाय ?’

टीम महाराष्ट्र देशा : प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय करण्याच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध पक्ष,नेते हे प्रियांका याचं स्वागत करत आहेत तर विरोधक यावर घराणेशाहीचा आरोप करत आहेत. मात्र यासर्व प्रतिक्रिया येत असताना आता अभिनेत्री पायल रोहतगीने देखील प्रियांका यांच्‍यावर टिका केली आहे.

प्रियांका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना एका ट्विटमध्ये पायलने लिहिलयं, ‘लोक म्हणतात, पंतप्रधान बनण्यासाठी इंदिरा गांधी यांनी लाल बहादुर शास्त्री यांची हत्या केली. ते म्हणतात, इंदिरा यांनी आपला मुलगा संजय गांधी यांची हत्या केली आहे. ते म्हणतात, ती एक हुकूमशहा होती.प्रियांका गांधी इंदिरा यांचे दुसर रुप आहे. आपणास आणखी एक हत्यारा, हुकूमशहा वा फॅसिस्ट हवाय? रक्त आणि मिळताजुळता चेहरा यामुळे एकसारखे गुणही असू शकतात.’

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसनं महासचिवपदी नियुक्ती केली. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं प्रभारीपदाची जबाबदारीदेखील त्यांना दिली त्यावर भाष्य करताना सुंदर चेहऱ्यांमुळे निवडणुका जिंकता येत नाही, असं भाजपा नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री विनोद नारायण झा यांनी म्हटलं आहे. प्रियांका भ्रष्ट रॉबर्ट वाड्राची पत्नी आहे. त्याचं नाव जमीन घोटाळ्यात पुढे आलं आहे, असंही झा यांनी म्हटलं.