fbpx

अभिनेत्रीचं वादग्रस्त ट्विट ; ‘शिवाजी महाराजांचा जन्म शुद्र जातीत’

टीम महाराष्ट्र देशा : कायम चर्चेत राहणारी बॉलीवूड अभिनेत्री पायल रह्तोगीने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केल. यावेळी पायलने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाल्याचं’ तिने म्हटलं आहे. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण का दिलं ? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे

पायल राह्तोगीने ट्विटरवर छ.शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करून हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही पोस्ट शेअर केली आहे. यापूर्वीही पायल अशाच वादामुळे चर्चेत आली होती.