‘पहिलवानांना पाच हजार रुपये मानधन द्या’

पहिलवान, pahilvan, मल्ल, wrestler

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या मल्लांना दरमहा पाच हजार रुपये मानधन किंवा इतर काही शासकीय मदत देण्यात यावी. तसेच गावस्तरावर कुस्तीचे फड पूर्ववत चालू करावेत, अशी मागणी बीडच्या शिवसंग्राम संघटनेने केलीय. यासंदर्भात सुधीर काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले आहे.

बीड जिल्ह्यात अनेक नामवंत मल्ल तयार होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवणारे मल्ल बीडच्या भूमीतून घडत असताना सध्या कोरोना लॉकडाऊनपासून या मराठी मातीचे वैभव असलेल्या खेळाला मरगळ आली आहे. गावाकडील जत्रा व यात्रांमधील फडांत कुस्त्या खेळून गुजराण करणाऱ्या मल्लांचे हाल होताहेत.

कुस्ती बंद झाल्याने आर्थिक ओढाताण होत असून घर खर्च तर लांबच पण मल्लांना लागणारा खुराक घेणेसुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या पहिलवानांना मासिक रुपये पाच हजार इतके मानधन काही काळासाठी द्यावे, यासह कुस्ती जीवंत ठेवण्यासाठी इतर उपाययोजनाही करण्याची मागणी काकडे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या