मुंबई: देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आता एक दिलासा देणारी बातमी राजेश टोपे यांनी दिली आहे. येत्या जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची मोठी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात होती, पण आता रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कसलीही चिंता करण्याची गरज नाही.
राजेश टोपे आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना आणि रुग्ण संख्या याविषयी माहिती देत नागरिकांशी संवाद साधला. रुग्णसंख्येवर लक्ष आहे, संख्या वाढली तर आवश्यक ती कारवाई करू. काळजी करण्याचा विषय नाही, चौथी लाट येणार नाही. सध्या रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीत, घरीच उपचार घेत आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –