संभाजीराजेंबद्दल पवार साहेबांची भूमिका डबल ढोलकी सारखी – राम शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती पुन्हा राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. राजे यापूर्वी राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या राज्यसभेचे सदस्य होते. यावेळी ते भाजप-राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र आता खुद्द संभाजीराजे यांनीच त्याचा नकार देत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सर्व पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ज्यावेळेस संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून निवड झाली होती. त्यावेळी पवार साहेबांनी नेमकी उलटी प्रतिक्रिया देऊन राजेंचा अपमान केला होता. यावर माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –