fbpx

विजयसिंह राज्यसभेवर तर रणजितसिंह विधानपरिषदेवर; मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी पवारांकडून पुढाकार

टीम महाराष्ट्र देशा – माढा लोकसभा मतदार संघातून स्वतः शारद पवार उभा राहणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोहिते पाटील गट कमालीच अस्वस्थ होता. परंतु आता सर्व समर्थकांची आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी दुर करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेत, राज्यसभा आणि विधान परिषद देऊन नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माढा लोकसभेचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार आहेत. तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवणार आहेत. अशी माहिती खात्रीदायक सूत्राकडून मिळाली आहे.

यासाठी खुद शरद पवारांनी मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.