fbpx

दिल्लीतील पवारांचं घर बनलं रणनीतीचं केंद्र, दिदींना पाठिंबा देण्यासाठी विरोधकांची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : शारदा चीटफंड घोटाळ्यावरुन केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आमने-सामने आले आहेत. पोलीस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्यास गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मात्र, आता त्या पाच अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी सरकार विरोधात धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. त्यामुळे सध्या देशात मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी असे चित्र आहे आणि आता या वादात इतर नेत्यांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान,या धामधुमीत  शरद पवारांचं दिल्लीतलं ६ जनपथ हे निवासस्थान पुन्हा एकदा रणनीतीचं केंद्र बनलंय. पश्चिम बंगालमधील घडामोडीनंतर पुढची भूमिका ठरवण्यासाठी दिग्गज पवारांच्या घरी येऊन पुढील रणनीती ठरवत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने पश्चिम बंगालमध्ये विरोधकांची मोठी सभा झाली होती त्यात सर्व विरोधकांनी एकी दाखवत या मंचावर हजेरी लावली होती.

2 Comments

Click here to post a comment