बहुजन समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळू नये म्हणूनच पवार पिता-पुत्रीचा आटापिटा

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा : सरकारने १,३०० मराठी शाळा बंद केल्याचा अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांच्या टीकेने सरकार बदनाम होणार नाही, परंतु त्यामुळे बहुजन समाजातील मुले गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतील. या समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळू नये, म्हणूनच त्यांचा हा आटापिटा चालला आहे का ? पवार पिता-पुत्रीने शिक्षण क्षेत्राचे राजकारण करणे थांबवावे. असा घणाघाती टोला राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

Loading...

ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. मी शिक्षणमंत्री झाल्यापासून चांगले निर्णयही वादग्रस्त कसे केले जातात, हे शिकलो, असा टोला त्यांनी लगावला.Loading…


Loading…

Loading...