fbpx

पुन्हा निवडणूक लढवावी लागणे हे पवारांचे अपयश, भाजपने जागा सोडल्यास माढ्यातून लढणार

mahadev-jankar-

मुंबई: शरद पवार यांचे पूर्वीप्रमाणे स्टेट्स राहिलेले नाही त्यामुळेच त्यांना निवडणूक लढवावी लागत आहे, हे त्यांचे अपयश असल्याचे म्हणत रासप नेते महादेव जानकर यांनी शरद पवारांवर निशाना साधला आहे. भाजपने रासपला माढ्याची जागा सोडल्यास पवारांच्या विरोधात लढण्यास तयार असल्याचं जानकर म्हणाले.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे ६ जागांची मागणी केली आहे. यामध्ये बारामती, माढा, परभणी, हिंगोली, ईशान्य मुंबई आणि अमरावतीचा लोकसभेचा समावेश आहे. जानकर हे २०१४ साली लढलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी खास आग्रही आहेत. मुख्यमंत्री बारामतीत कमळ फुलणार असे सांगत असले तरी ते माझे भाऊ आहेत, आमच्या बैठकीनंतर ते रासपला जागा सोडतील, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये धनगर समाजाचा मेळावा आयोजित करणात आला आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री धनगर आरकक्षाणाबाबत चांगली बातमी देणार असल्याचंही जानकर म्हणाले.