मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये;निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर जहरी टीका

nilesh and sanjay raut

टीम महाराष्ट्र देशा:मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये. जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या भावना दुखवल्या तेव्हा हा भाडखाऊ आगीत तेल ओतायला येतोच. कोणीही गोयलचं समर्थन केलेलं नाही पण ह्याला मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत.या जहरी शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ती भाजप नेते निलेश राणे यांनी.

जय भगवान गोयल या भाजपनेत्याने ‘ आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर महाराष्ट्रभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असताना.संजय राऊत यांनी म्हटले होते कि ‘महाराष्ट्रातील जनता बोलतेय, छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावे.यालाच उत्तर म्हणून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी संजय राऊत यांना चांगलेच उत्तर दिले होते आता या वादात निलेश राणे यांनी उडी घेतली आहे.

आता यावर शिवसेनेकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.पण दिवसेंदिवस निलेश राणे हे शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.