वचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख !

टीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या गावात ग्रामपंचायत असल्यामुळे निधी अभावी गावच्या विकासाला अडथळा निर्माण होत होता. मुरुडकरांची हीच अडचण लक्षात घेऊन नागरी सत्काराला आलेले मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी मुरुडकरांना या शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी लवकरच ग्रामपंचायतचे रुपांतर नगर परिषदेत करू असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता ६० दिवसाच्या आत झाल्याने मुरुडकरांनी मोठ्या उत्साहात आनंदोस्तव साजरा केला.

काही दिवसांपूर्वीच मुरुड येथे लातूर-बिदर एक्सप्रेसला थांबा मिळावा,अशी मागणी मुरुडकरांनी अभिमन्यू पवारांजवळ केली असता त्यांनी त्याची लागलीच दाखल घेत त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला व ती मागणी मंजूर करून घेतली. त्याकारणाने मुरुडकरांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला होता.आता पुन्हा पवारांच्या पाठपुराव्याने मुरुडकरांच्या दुसऱ्या वचनाची पूर्तता झाली त्यामुळे पवारांची जिल्ह्यात वचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून ओळख व्हायला लागली आहे.

मुरुड ग्रामपंचायतऐवजी आता या शहराला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त होत आहे.राज्य सरकारचे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देता आला असता मात्र मुरुड तालुक्याचे ठिकाण नाही. अभिमन्यू पवारांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुरुड शहराला थेट नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आला आहे.त्यासंबंधीचे परिपत्रक लवकरच निघणार आहे.