या तालमीतून त्या तालमीत गेला, अन् … : पवारांनी साधला पाटलांवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांना काल पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काल इंदापूरमध्ये त्यांची शेवटची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले की, ” भाजपने एकाही वर्गासाठी सत्तेचा वापर केला नाही आणि आज म्हणतात आम्हाला मत द्या. शिवाय मुख्यमंत्री म्हणतात की आमच्याकडे तेल लावलेले पैलवान आहेत. मात्र विरोधी पक्षाकडे लढायलाच कोणी नाही मात्र तुम्ही काल हिकडच्या तालमीत होता. आज तुम्ही तिकडच्या तालमीत गेलात. अनं तेल लावलयं तुम्ही?” असे म्हणतं पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधला.

हर्षवर्धन पाटील यांना एकोणीस वर्षे सत्ता मिळाली मात्र त्यांनी काय केलं नाही. आता विद्यमान आमदारांना निवडून आणण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे पाठीमागील सर्व भरपाई करण्याचे काम पाच वर्षात करण्याचा निर्णय घेतला. या गड्याने करुन दाखवले म्हणत शरद पवारांनी भरणेंची पाट थोपाटली.

राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी बंडखोरी करत भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांना दमदाटी करत असल्याचं शरद पवार यांना समजले होते. यानंतर पवारांनी त्यांना एक प्रकारे दमच दिला आहे. ”नदीच्या अलीकडचे काही लोक आहेत. आता त्यांनी मतदारांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्यामाहिती मिळाली आहे. इथं दमदाटीचं राजकारण कुणी केलं नाही. जर अस कुणी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीपण जशास तसे उत्तर देऊ. आम्ही सरळला सरळ आहे. पण कुणी वाकडे पाऊल टाकलं तर पाय काढायला पण मागेपुढे बघणार नाही,” असा इशारा  पवार यांनी इंदापुरातील  बंडखोरांना  दिला.

महत्त्वाच्या बातम्या :