fbpx

‘देशाच्या हितासाठी पवारांनी मोदींना साथ द्यावी’

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता एनडीएसोबत यावे. कारण काँग्रेस देशात लवकर सत्तेत येईल असं वाटत नाही. त्यामुळे देशाच्या हितासाठी पवारांनी मोदींना साथ द्यावी असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याच आवाहन केले आहे. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच रामदास आठवले कोल्हापूर येथे आले होते. यावेळी आठवलेंनी पत्रकार परिषद घेतली.

आठवले म्हणाले की, कॉंग्रेस सत्तेत येणे आता अवघड आहे. त्यामुळे शरद पवारांनी देखील देशाहितासाठी एनडीए मध्ये शामिल व्हावे. तसेच प्रकाश आंबेडकर हे वंचितांना सत्तेपासून दूर ठेवत आहेत. त्यामुळे वंचितांना सत्तेत आणायचे असल्यास प्रकाश आंबेडकर यांनी देखील एनडीएबरोबर यावं अस मत आठवले यांनी यावेळी मांडले आहे.

दरम्यान या विधान सभा निवडणुकीत छोट्या मित्र पक्षांना २० जागा हव्या आहेत. त्यापैकी आठवले गटाला १२ जागा मिळाव्यात आणि सत्तेत वाटा मिळावा अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी बोलून दाखवली.