पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं; बाळासाहेब थोरातांचं शरद पवारांना खुलं आवाहन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसची स्थितीबद्दल मोठे भाष्य केले आहे. काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या जमीनदारासारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपआपल्या तयारी सुरु केली आहे. यावरुन आघाडीमध्ये मतभेत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं होतं. यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत.

आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत नाही. शरद पवारांच्या विचाराने काँग्रेसच्या विचारांचे नुकसान होणार नाही. पण राज्य घटनेशी, मूलभूत तत्वांशी निगडीत विचारांचे आहेत त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं. शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं, असं मोठं वक्तव्य यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्रं लढाई करावी, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या