पवार म्हणतात,’विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार’, ‘पत्रकारांनी तत्काळ याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं’

टीम महाराष्ट्र देशा(प्रवीण डोके) – आगामी लोकसभेला माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उभा राहणार आहेत. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोहिते पाटील समर्थक कमालीचे नाराज आहेत.

त्यावर मोहिते पाटील यांचे पुनर्वसन करण्यासाठी खुद्द शरद पवारांनी पुढाकार घेतल्याची माहिती समजली आहे. अकलूज येथे एका बैठकी दरम्यान पवार म्हणाले की, विजयदादांना मी स्वतः राज्यसभेवर पाठविणार. त्याचवेळी तिथे उपस्थित असणाऱ्या एका चाणाक्ष पत्रकाराने तत्काळ या पवारसाहेबांच्या बोलण्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले.

खरतर त्यामागे कारणही तसेच आहे. कारण पवार आपले वाक्य फिरविण्यात माहीर आहेत हे जगजाहीर आहे. उद्या पुढे चालून ‘असं मी म्हणालोच नव्हतो’ असे वाक्य कानावर पडू नये, म्हणून त्या पत्रकाने ते मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतल असल्याचे समजते आहे.

तर दुसरीकडे सोलापुरात विजयदादा आणि तिकडे प्रभाकर देशमुखांना लोकसभेसाठी झुलवत ठेवल्याने मतदार संघातील लोकांना हे आवडलेले दिसत नाही. त्यामुळेच दोन्ही नेत्यांचे समर्थक कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहे.

सोशल मीडियावरून काही कार्यकर्त्यांनी तर मोहीमच उघडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर पवारांच्या विरोधात मेसेज देखील फिरायला सुरु झाले आहेत. पवारांना विरोध म्हणून ‘माढा.. बारामतीकरांना पाडा’, तर सुभाष देशमुखांना पाठींबा म्हणून, ‘लढा माढ्यात… घडवा इतिहास’ हा मेसेज सध्या सर्वत्र जोरदार फिरत असताना पाहवयास मिळत आहे.