fbpx

हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून पवार साहेब सांगतील त्याच उमेदवाराचंं काम करू – मुश्रीफ

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चेला फुलस्टॉप द्या. पक्षाध्यक्ष शरद पवार जो उमेदवार देतील, त्याच्या विजयासाठी गेल्या निवडणुकीप्रमाणेच हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करू, असे सांगत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षरीत्या खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आहे.

दरम्यान, मुंबईत खासदार महाडिक यांच्या विरोधातील तक्रारी हे आमच्या घरचे भांडण होते, बंद खोलीत एकमेकांच्या उकाळ्या काढल्या गेल्या; पण बाहेर आल्यानंतर आम्ही सगळे एकच आहोत. त्यामुळे या चर्चेला फुलस्टॉप देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने 10 जानेवारीपासून काढण्यात येणारी निर्धार परिवर्तन यात्रा 27 जानेवारी रोजी कोल्हापुरात येत आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत मुश्रीफ यांनी उपरोक्त निर्धार व्यक्त केला.

1 Comment

Click here to post a comment