‘पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे’

gopichnad padalkar

मुंबई: राज्यावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. विदर्भ, मराठवाडा या भागात गुलाब चक्रीवादळाने शेतीचे, रस्त्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. यावरूनच आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

‘शरद पवार साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही,आज शेतकरी खरा भिजला आहे’ असे ट्वीट करत गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. अवकाळीने शेतीचे नुकसान झाले आहे. आणि अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता संताप व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रवीण दरेकर यांनी मराठवाडा दौरा करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. विरोधी पक्षाकडून सतत ठाकरे सरकारवर यावरून टीका केली जात आहे. तर सरकारने त्वरित शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या