पवार साहब कबतक मॅच फिक्सिंग करोगे – असदुद्दिन ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा : ” एमआयएमवर आरोप करणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच मॅनेज आहे. तीन तलाक चे विधेयक आले तेव्हा शरद पवार काहीच बोलेल नाही. उलट त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. पवार आणि मोदी यांची राज्यात एक आणि केंद्रात एक सेटिंग आहे. पवार साहब कबतक मॅच फिक्सिंग करोगे,” अशा शब्दांत एमआयएमचे संस्थापक आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. बीडमध्ये एमआयएमचे उमेदवार शेख शफीक यांच्या प्रचारसभेत खासदार ओवेसी बोलत होते.

ओवेसी म्हणाले की, आमच्यावर आरोप करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पिक्चर आता संपला आहे. त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मधील नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. तिथून तिकीट घेऊन ते निवडणूक लढवत आहेत आणि माझ्यावर आरोप करत आहेत. माझा गुन्हा फक्त हाच आहे की, मी भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला घाबरत नाही.” तसेच संविधान आणि देशात शांती आणण्यासाठी बीडमधील एमआयएमचे उमेदवार शेख शफीक यांना निवडून द्या, ” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, २९८५ मध्ये ज्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेचा पराभव केला होता तेच माजी आमदार पंडितराव दौंड वयाच्या 82 व्या वर्षी परळी रेणापूर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आज त्यांनीच धनंजय मुंडेच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना परळी मतदारसंघांमध्ये मात्र मुंडे बंधू-भगिनीच्या लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष वेधले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :