कट्टर विरोधक असणारे शरद पवार – राजू शेट्टींची पाऊण तास गुफ्तगू

टीम महाराष्ट्र देशा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पाऊण तास चर्चा झाली. मात्र या चर्चेत काय झाल याचा तपशील काही बाहेर आला नाहीये. राजू शेट्टी यांनी दिल्ली मध्ये जाऊन पवार यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी भेट घेतली.

भाजप हा मित्र पक्षांना कमी लेखत असल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वप्रथम शेतकरी संघटनेने सोडली. शिवसेनेनेही आगामी काळात भाजपशी युती करण्यास नकार दिला आहे. तेलगू देसमही भाजपशी संघर्ष करत आहे. त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत सत्ता मिळविणे अवघड जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. अस मत राजू शेट्टी यांनी भेटी नंतर व्यक्त केल.

पवार आणि शेट्टी हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. मात्र गेल्या काही दिवसात राजकीय परस्थिती बदलल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद निर्माण झाला आहे. राजु शेट्टी यांच्या पुढाकाराने मुंबईत घेतलेल्या संविधान रॅलीमध्ये पवार सहभागी झाले होते. त्यानंतर आता दिल्लीत शेट्टी यांनी पवार यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. भाजप विरोधातील रणनितीबाबत आणि राज्यातील राजकारणाताबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.