पवारांना या वयात बांधावर उतरायला लागतंय हेच महाविकास आघाडीचं अपयश आहे : पडळकर

padalkar vs pawar

सांगली : सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा असा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला दोन दिवसांपपूर्वी झालेल्या पावसामुळे हाती आलेलं सोन्यासारखं पिक देखील गमवावं लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. तर, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याचा आढावा दौरा करणार आहेत.

शरद पवारांच्या या दौऱ्याचा राज्यात कौतुक होत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांवर घणाघात केला आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय, शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागचा दौरादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते तेव्हाचा होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टीका पडळकरांनी केली आहे.

तर, शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाविकास आघाडीचं अपयश असल्याचा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व इतर नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, असा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या-