fbpx

पवार कुटुंबीय घट्ट राहण्यासाठी पंकजा मुंडेंनी दिल्या शुभेच्छा

टीम महाराष्ट्र देशा :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांनी प्रचाराचा चांगलाच धडाका लावला आहे. तर या प्रचारा दरम्यान मोदी आणि पवार यांच्यातील शाब्दिक युद्ध देखील पाहायला मिळत आहे. वर्ध्यामधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करत पवारांच्या घरात कौटुंबिक वाद आहेत असे वक्तव्य केले होते.

मोदींनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यात पवार आणि मोदी यांच्या शाब्दिक युद्धाला सुरवात झाली. तर दुसरीकडे भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मात्र पवार कुटुंब घट्ट राहावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांनी पवार कुटुंबाचे विभाजन होऊ नये, यासाठी मी प्रार्थना केली आहे. तसेच कुणाचं घर फोडून फटाके फोडण्याची सवय आम्हाला नाही, असा टोला देखील राष्ट्रवादीला लगावला.

दरम्यान, मोदींनी केलेल्या गृहकलहाच्या दाव्याचं पवारांनी खंडन केलं होतं. आणि आता पंकजा मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.