नातवामुळे पवार घराण्याची परंपरा धुळीला, कुटुंबाचा ५० वर्षातील पहिला पराभव

विरेेश आंधळकर: आज लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत, देशासह महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना दणदणीत विजय मिळताना दिसत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव झाला आहे. पार्थ यांच्या पराभवाने पवार घराण्याची विजयी होण्याची ५० वर्षांची परंपरा मोडली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा शरद पवार यांच्या नातवाला उमेदवारी देण्यात आली होती. पार्थ पवार यांच्यापुढे शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान होते. मुलाच्या विजयासाठी अजित पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिके पाठोपाठ मावळमध्ये मतदारांनी अजित पवार यांना नाकारले आहे.

Loading...

गेली ५०  वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे सक्रिय राजकारणात आहेत. विरोधकांकडून टीका होत असताना मागील ५०  वर्षांपासून पवार निवडणुकांत विजयी होत असल्याचा दाखला राष्ट्रवादी नेत्यांकडून दिला जातो. पवार साहेब यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी देखील आजवर सर्व निवडणूका जिंकल्या आहेत. मात्र दुसरीकडे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असणारे पार्थ यांना सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली