‘पवार कुटुंब फक्त जनतेच्या पैशावरच आयुष्य जगतंय, वाटेल तशी मजा करतंय’

pawar family

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यम यंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडीया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.

दरम्यान,अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पवार यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.अशातच सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने सरकारवर मोठी टीका होत आहे.

मात्र, चौफेर टीकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवारांच्या कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं असून भाजप नेते निलेश राणे यांनी या प्रकरणारवर सडकून टीका केली आहे.

‘निर्णय मागे घेऊन कोणावर मेहेरबानी केली अजित पवारांनी? टीका झाली नसती तर ६ कोटी वापरले असते ना… काय तर म्हणे एक पाऊल मागे. पवार कुटुंब फक्त जनतेच्या पैशावरच आयुष्य जगतंय. मुंबई मधलं यशवंतराव चव्हाण सेंटर स्वतःचं असल्यासारखं पवार कुटुंब वापरतात. पवार कुटुंबाने जनतेच्या पैशावरच वाटेल तशी मजा केली,’ असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP