fbpx

ईव्हीएमवर पवार घराण्यात मतभेद; शरद पवारांचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह तर अजित पवार म्हणतात. . .

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यासाठी १९ मे रोजी मतदान होणार आहे, तर २३ मेला निकाल जाहीर होणार आहेत. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीचं ईव्हीएमवर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, यामध्ये आता एका बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीय, दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमबाबत शंका नसल्याचे म्हंटले आहे.

ईव्हीएमवरून पवार कुटुंबातच मतभेद असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी घड्याळाचं बटण दाबल्यावर कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पहिल्याच म्हंटल आहे, आपल्याला ईव्हीएम मशीनबद्दल चिंता वाटत असल्याचं देखील ते म्हणाले होते.

अजित पवार यांनी मात्र ईव्हीएमबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नसल्याचे स्पष्ट केले आहे. ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजपाला पाच राज्यात पराभवाचा सामना करावा लागला नसता, असंदेखील अजित पवार म्हणाले आहेत.

खा सुप्रिया सुळे यांनी देखील शरद पवार यांच्याप्रमाणे ईव्हीएमवर विश्वास नसल्याचं सांगितल केला. निवडणुकांमध्ये ईव्हीएम नको, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचं देखील सुप्रिया सुळें म्हणाल्या आहेत.