बारामतीच झालं, संपूर्ण पवार कुटुंबियांसह राष्ट्रवादीचे बडे नेते आता मावळमध्ये ?

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान मंगळवारी पार पडले आहे, महाराष्ट्रातील १४ मतदारसंघासह देशभरातील ११७ जागांसाठी हे मतदान झाले आहे. यामध्ये पवार कुटुंबियांचा गड असणाऱ्या बारामतीचा देखील समावेश आहे. यंदा पवार घराण्यातील सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे लोकसभेच्या मैदानात आहेत. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर आता संपूर्ण कुटुंबियांसह राष्ट्रवादीचे बडे नेते मावळकडे वळले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज्यातील शेवटच्या टप्यात २९ एप्रिल रोजी येथे मतदान होणार आहे. पार्थ यांना शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खा. श्रीरंग बारणे यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे अजित पवार यांना पुत्राला लोकसभेत पोहचवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. सुरुवातीच्या टप्यात शरद पवार यांनी मावळात एक सभा घेतल्यानंतर राज्यभरातील इतर मतदारसंघात लक्ष दिले होते. आता शेवटच्या टप्यात खुद्द शरद पवार हे देखील मावळात जास्त लक्ष घालण्याची शक्यता आहे.

Loading...

पार्थ पवार यांचे राजकारणातील यशस्वी पदार्पण करण्यासाठी पवार कुटुंबियांना मेहनत घ्यावी लागणार आहे, भौगोलिक दृष्ट्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे अवघड आहे. पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घाटावरचे आणि घाटाखालील भाग समजाला जाणारे पनवेल, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभेत समाविष्ट आहेत. कधीकाळी अजित पवार यांचे पिंपरी चिंचवडमध्ये वर्चस्व होते, मात्र अजितदादांच्या शिलेदारांना गळाला लावत भाजपने चिंचवडचा गड काबीज केला. त्यामुळे पिंपरी, चिंचवड आणि मावळमध्ये शिवसेना – भाजपचे पारडे सध्या जड आहे.

लोकसभेच्या निमित्ताने अजित पवार यांना पुन्हा एकदा चिंचवडचा कारभार आपल्याकडे घेण्याची संधी आहे. मात्र हे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे मावळात राजकीय नाकेबंदी करण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबाला मैदानात उतरावे लागणार आहे. यामध्ये दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार या देखील आक्रमकपणे प्रचारात सहभागी होणार असल्याचं दिसत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?