‘पवारांनी मुंडेंचे घर फोडले नाही, मी त्या घटनेचा साक्षीदार आहे’

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे घर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी फोडले आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता. याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

क्षीरसागर यांनी इतिहासाचा विपर्यास करू नये. मुंडेंचे घर शरद पवार यांनी फोडले नाही. मी त्यावेळी तिथेचं होतो. त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच क्षीरसागर यांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये असा सल्लाही आव्हाडांनी दिला . जयदत्त क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करताना शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. यावेळी शरद पवार हेच मुंडेचे घर फोडण्यास कारणीभूत असल्याच क्षीरसागर बोलले होते.

दरम्यान बीडमध्ये शरद पवारांनी जयदत्त क्षिरसागर यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आज जयदत्त क्षिरसागर यांनी टीकेला प्रत्युत्तर देत हल्ला चढवला आहे. ‘पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिलं. असं राज्यात अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. पवारांनी दुसऱ्याला आदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावं’ असा सल्ला जयदत्त क्षिरसागर यांनी पवारांना दिला.

महत्वाच्या बातम्या