‘जरंडेश्वर शुगरचा खरा मालक लपवण्यासाठी पवारांनी डझन कंपन्यांचे लेयर तयार केले’, किरीट सोमय्यांचा दावा

kirit somayya

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. यावरूनच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा एक नवा दावा केला आहे.

अजित पवारांनी जरंडेश्वर शुगरचा खरा मालक लपवण्यासाठी डझन कंपन्यांचे लेयर तयार केले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर या अगोदरही सोमय्या यांनी जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवरही कारवाई सुरू असल्याचे म्हटले होते.

30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. तर या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांनी भाजप नेत्यांकडून सोमय्या प्रकरणाची माहिती घेतली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आज किरीट सोमय्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या 1500 कोटी घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली येथे ग्राम विकास सचिवांना भेटणार आहे आणि मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टचा पाठपुरावा करण्यासाठी पर्यावरण सचिवांना भेटत आहे.याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या