‘मोदींसह पवारांनी देखील लस घेतली, मात्र उद्धव ठाकरेंनी अद्यापही लस का घेतली नाही ?’

uddhav thakrey and vaccine

मुंबई : १६ जानेवारी पासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोव्हीड योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. आता, १ मार्चपासून ६० वर्षांवरील सामान्य नागरिक तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना लस घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी लसीकरण करून घेत सामान्यांनी देखील विना संकोच लसीकरणाला प्रोत्साहन द्यावे असं आवाहन केलं आहे. राज्यातील काही मंत्र्यांनी देखील लसीकरण करून घेतले आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही लस घेतलेली नाही.

यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार, शरद पवार यांनी लस घेतली मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस घेत राज्यातील लसीकरणाला गती का नाही दिली? महाराष्ट्र सर्वाधिक कोरोना बाधित राज्य आहे. अफ्रिकेची खोटी माहिती देण्याएवजी लस घेऊन लसीकरणाला चालना द्यायला हव होतं,’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या