fbpx

एअर स्ट्राईकबाबत पवारांनी पुन्हा व्यक्त केली शंका, ते स्ट्राईक भारतातचं

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मिडिया हे प्रभावी अस्त्र उपसले आहे. कमीत कमी वेळात आपला संदेश कार्यकर्त्यान पर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक LIVE करत पवार कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिना निमित्त शरद पवार यांनी पहिला फेसबुक LIVE केला. यावेळी पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र एअर स्ट्राईकबाबत पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नव्हते. ते हवाई हल्ले भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्येच केले होते आणि काश्मीरचा तो भाग हा भारताचाच भाग आहे असंही पवार यांनी सांगितलं.

पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नेटकरी मंडळी नाराज झाली आहेत. आपल्याचं सैन्य दलावर पवार वारंवार का शंका घेतात असे प्रश्न विचारले जात आहेत. याआधी देखील अशा प्रकारची वक्तव्य शरद पवार यांनी केली होती.