‘पावनखिंड’ चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने केले स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्राचे आकर्षण सर्वानाच आहे. याच शिवचरित्रातील एक सुवर्णपाण म्हणजे ‘पावनखिंड’ छत्रपती शिवाजी महाराज सुखरुप विशालगडावर पोहचावे यासाठी ३०० मावळ्यांना हाताशी धरुन शत्रुंना पावनखिंडीत रोखण्याचा पराक्रम बाजीप्रभु देशपांडे यांनी केला होता.

शिवचरित्रातील हाच अध्याय सांगणारा पावनखिंड हा चित्रपट १० जुन रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना संसर्गामुळे दुसऱ्यांदा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करणार असे सांगितले आहे. ‘पावनखिंड’ चित्रपट तयार आहे. मात्र कोरोनामुळे प्रदर्शित करण्यास अडथळा येत आहे. जेव्हा चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेश मिळताच या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भेटीला घेउन येऊ असे लांजेकर यांनी सांगितले.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं पावनखिंडीची गाथा चित्रपटात मांडली आहे. घोडखिंड म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी गनिमांची वाट रोखून धरली होती. पराक्रमाची शर्थ करताना बाजीप्रभु यांनी प्राणांची आहुती दिली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या या खिंडीला ‘पावनखिंड’ असे नाव देण्यात आले. दिग्दर्शक दिग्पालने याआधी ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.

महत्वाच्या बातम्या

IMP