मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

nana patole

मुंबई: राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. मात्र, या वेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधी सूचक वक्तव्य केले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा उल्लेख करतांना त्यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून आमचे माजी आणि आजी सहकारी असे म्हणत, या चर्चेला सुरूवात करुन दिली आहे. आता यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंना गंमत करायची सवय आहे. त्यानुसारच ते बोलले असतील. महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत लोकांमध्ये ताणतणाव आहे. मुख्यमंत्र्यांची आधीपासूनच थट्टामस्करी करण्याची सवय आहे. आजही त्यापद्धतीनेच त्यांनी जोक केला, गंमत केली. शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा हे त्यांच्या हातात आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षे टिकणार असा विश्वास आहे. त्यांनीही ते खुपदा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विधान जास्त गंभीर घेण्याची गरज नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावरच भाजपचे प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे बाळासाहेब थोरात यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या