मुख्यमंत्र्यांसह सरकारवर गुन्हा दाखल व्हावा- पटोले

NANA-FADNAVIS

नागपूर-  धुळे येथील धर्मा पाटील या शेतक-याने मंत्र्यालयात विषप्राशन करून आत्महत्या केली होती. या आत्महत्येस राज्य सरकार जबाबदार आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी आज, सोमवारी नागपुरात केली.

Loading...

नागपुरातील बजाजनगर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत पटोले म्हणाले की, अमरावती येथे 2016 साली एका 10 वर्षांच्या मुलाच्या नदीच्या खड्ड्यात पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी स्थानिक नगराध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर जसे गुन्हे दाखल झाले होते. त्याचधर्तीवर धर्मा पाटील आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच या संपूर्ण प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.Loading…


Loading…

Loading...