सरकारमधील तीन पैकी एका पक्षात पाटील प्रवेश करू शकतात; संजय राऊतांचे भाकीत

sanjay raut vs chandrkant patil

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल असे म्हणत राज्य खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावला आहे. त्या दोन दिवसातील 24 तास संपले. आता 24 तास राहिले आहेत. वाट पाहा. ते काय भूकंप करतात ते पहा, चंद्रकांत पाटील महाविकास सामिल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिसू शकते.

तीन पैकी एका पक्षात ते प्रवेश करू असं पाटील यांना वाटत असेल, म्हणून त्यांना माजी राहणार नाही असं म्हटलं असावं. मुख्यमंत्र्यांनीही पाटील तीन पैकी एका पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ते नागालँडमध्ये जाणार आहेत, राज्यपाल म्हणून, त्यांच्या अस्वस्थ मनामुळे त्यांना नागालँडच्या राज्यपालपदाची ऑफर दिली आहे, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या