मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

blank

टीम महाराष्ट्र देशा– लायन्स क्लब औरंगाबाद चिकलठाणा यांच्या वतीने पद्मश्री स्व. डाॅ. शरदकुमार दिक्षित यांच्या स्मरणार्थ 42 व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन आज (दि.13) रोजी शहरातील N-1 सिडको परिसरातील लायन्स आय हॉस्पीटल च्या प्रांगणात करण्यात आले होते.
या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळपासून जिल्ह्य़ातील विविध भागातून आलेल्या रुग्णांनी या ठिकाणी गर्दीत केली होती. उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर लगेचच रूग्णांना टोकन देण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर टोकन मिळालेल्या रुग्णांचे केस पेपर तयार करण्यात आले. केस पेपर तयार झालेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी तारीख देण्यात आली असुन उद्या गुरुवारपासून एमजीएम हॉस्पीटल मध्ये या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रुग्णांच्या सुविधेसाठी लायन्स क्लबने सर्व सुविधा उपलब्ध केल्या होत्या. रूग्णांना बसण्यासाठी आसनव्यवस्था तसेच जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. रूग्ण तपासणी करताना लहान बालके व महिलांना प्राधान्य देण्यात आले.
तत्पूर्वी, कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून .श्री. एच आर गायकवाड व्यवस्थापकीय संचालक, ( बीव्हीजी ) डॉ. विजय मोराडिया ( प्लॅस्टिक सर्जन यूएसए ), कल्याणी बासन्वार, डॉ. कवलजीतकौर भाटिया बालरोगतज्ञ (यूएसए),
श्री अंकुशराव कदम
अध्यक्ष महात्मा गांधी मिशन