‘हा तर मोदी शहांचा कट’; हार्दिक पटेल प्रवीण तोगडियांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा: पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे. यावेळी बोलताना हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावरून प्रवीण तोगडियां विरोधात कट रचत आहेत असा गंभीर आरोप केला आहे. तसेच तोगडिया आणि आम्ही शेतक-यांच्या हिताचे मुद्दे उचलतो म्हणून आम्हाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुद्धीवर आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जुन्या खटल्यांचा हवाला देऊन माझा एन्काऊंटर करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे.

bagdure

पुढे बोलताना ते म्हणाले कि ‘अनेक वर्षांपासून मी हिंदू एकतेसाठी लढतो आहे. मात्र जाणीवपूर्वक माझा आवाज दाबला जातो आहे. माझ्या घरी सकाळच्या वेळी आलेल्या एका माणसाने तुमचे एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याची धक्कादायक माहिती दिली. मात्र मी घाबरलो नाही डगमगलो नाही. माझ्यावर सेंट्रल आयबीकडून दबाव टाकला जातो आहे. देशभरात आपल्या विरोधात खटले भरवण्यात आले. ज्या केसेस ठाऊकही नाहीत त्या जुन्या केसेस उकरून काढत माझे नाव त्यात गोवण्यात आले. यातूनच मला अटक करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. गुजरात पोलीस असो किंवा राजस्थान पोलीस मी कोणाच्याही विरोधात नाही. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई करू नका मी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे आवाहन प्रवीण तोगडिया यांनी केले.

प्रवीण तोगडिया बेपत्ता झाल्यानंतर वीहिंपने अहमदाबाद क्राईम ब्रान्चमध्ये तक्रार दाखल केली होती. तोगडिया संशयित परिस्थितीत बेपत्ता झाले असून त्यांच्या जीवाला धोका आहे, असं विहिंपने तक्रारीत म्हटलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलं. अहमदाबादमधील विहिंपच्या कार्यालयाबाहेर एसआरपीचे सुमारे 30 जवान सुरक्षेसाठी तैनात केले होते.

You might also like
Comments
Loading...