Breaking: पाटीदार आंदोलन नेता हार्दिक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा

टीम महाराष्ट्र देशा: पाटीदार आरक्षण आंदोलना दरम्यान भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी, पाटीदार समाज नेता हार्दिक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वीसनगर कोर्टाकडून हा निर्णय देण्यात आला आहे, हार्दिक पटेल यांच्यासह त्यांच्या आणखीन तीन समर्थकांना देखील या प्रकरणी दोषी ठरवण्यात आल आहे.

२०१५ मध्ये संपूर्ण गुजरात राज्यात पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते, यावेळी भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.

आता या प्रकरणी वीसनगर कोर्टाकडून निर्णय देण्यात आला आहे. यामध्ये हार्दिक पटेल यांच्यासह त्यांच्या तीन समर्थकांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अन्य १४ आंदोलकांची मुक्तता करण्यात आली आहे.