सीडीच्या नादात भाजप जाहीरनामा बनवण्याच विसरली – हार्दिक पटेल

hardik patel on bjp manifesto

टीम महाराष्ट्र देशा: सीडी बनवण्याच्या नादात गुजरातमध्ये भाजप जाहीरनामाच विसरली असल्याची खोचक टीका पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र अद्याप सत्ताधारी भाजपकडून आपला जाहीरनामाच प्रसिद्ध करण्यात आल नाही. यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे.

Loading...

‘गुजरातमध्ये विकासासोबत निवडणूक जाहीरनामाही हरवला आहे. साहेब तुम्हाला कोणी काही बोलणार नाही पुन्हा एकदा तुमच्या स्टाइलमध्ये जाहीरनाम्यामध्ये फेका’ म्हणत हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच धारेवर धरल आहे

गुजरात निवडणुकीमध्ये हार्दिक पटेलचे कथित व्हिडीओ जाहीर करण्यात आले होते. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता हर्दिकेनेही याच मुद्यावरून भाजपवर निशाना साधाला आहे.Loading…


Loading…

Loading...